अकोला- कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर अहोरात्र काम करणारे शासकीय आरोग्य, पोलीस कर्मचार तसेच अन्य सर्व कर्मचाऱ्यांना पौष्टीक अन्न म्हणून शेतकऱ्यांनी पिकवलेली केळी मोफत देत आहेत. नरनाळा शेतकरी उत्पादक कंपनी या अकोट येथील संस्थेने हा उपक्रम राबविला आहे.
या आपत्तीच्या प्रसंगी अहोरात्र कष्ट करणारे महसूल, आरोग्य, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी आपापली जबाबदारी अहोरात्र राबून पार पाडत आहेत. त्यांच्यासाठी या शेतकरी कंपनीने २२०० डझन केळीचे वाटप केले. या वाटपाच्या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह शेतकरी कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.