अकोला- जिल्ह्यात आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. पातूर येथील सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता ही संख्या नऊ वर पोहोचली आहे.
आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) १० जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १५७ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ११४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १०५ निगेटिव्ह आहेत. तर नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून २८१ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ९८ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. (८१जण गृह अलगीकरणात तर १७जण संस्थागत अलगीकरणात) तर १३४ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ४८ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.