अकोला- येथील रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनी ने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये व कार्यालयांना हॅण्ड सॅनिटायझरचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. या सेवाभावी उपक्रमाचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याहस्ते पहिला साठा आरोग्य यंत्रणेकडे सूपूर्द करुन करण्यात आला.
सामाजिक भावना म्हणून वाणिज्यिक सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत सर्व सरकारी दवाखाने आणि सरकारी कार्यालये याना मोफत पुरवठा करण्याचे रॅली इंडियाने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा हस्ते पहिला साठा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांना देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांचीही उपस्थिती होती.रॅलीज हि टाटा ग्रुप कंपनी असून वाणिज्यिक सामाजिक उत्तरदायीत्व अंतर्गत टाटा ग्रुप सोबत हा उपक्रम राबवत आहे. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, रॅलीज चे युनिट हेड जतिंदर दुबे व एच आर मॅनेजर राजेश राजंदेकर उपस्थित होते.