अकोला (दि 9 एप्रिल) : देशात तसेच अकोल्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाग्रस्ताची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दोन दिवसाआधी एकही कोरोनाग्रस्त नसलेल्या अकोल्याला आता कोरोना ग्रहण लागले आहे. पातुर तालुक्यातील सात संदिग्ध रुग्णांचे अहवाल बुधवारी रात्री उशीरा ‘पॉझिटिव्ह’ आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली. अकोला शहरातील दोन व पातुर तालुक्यातील आणखी नवे सात असे एकूण ९ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हे सातही रुग्ण पातुर येथील असून त्यामुळे अकोला शहरासह पातुर शहरातही दहशतीचे वातावरण पसरले आहे.
आतापर्यंत अकोला जिल्हा कोरोनाच्या सावटापासून दुर होता; परंतु मंगळवारी जिल्ह्यातील पहिल्या रुग्णांची नोंद अकोला शहरातील बैदपूरा भागात झाली. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच अकोट फैल भागातील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा बुधवारी २ झाला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बाधीत रुग्ण आढळलेला भाग व लगतचा परिसर सिल केला.
पातुरची सीमा सील
पातुरातील सात जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पातुरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून, सकाळीच पातुर शहराची सीमा सील करण्यात आली होती.
कोरोना संसर्गग्रस्तांचे अद्यावत अहवाल
अकोला जिल्ह्यात एकूण तपासलेले नमुने- १४८
अहवाल प्राप्त संख्या-१०९
पॉझिटिव्ह -९
निगेटिव्ह-१००
व्हिडीओ : पातुरातील ७ कोरोनाग्रस्त; जिल्हाधिकारी यांचे आव्हान