अकोट (शिवा मगर) :कोरोना या प्राणघातक विषाणूचा समूळ नायनाट करण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन अर्थात संचार बंदी घोषित करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश असतानाही अकोट शहरात काही समाज विरोधी प्रवृत्तीचे लोक कलम 144 नुसार लागू असलेल्या संचार बंदी आदेश दिले असतानाही अगदी मोकटपणे शहरात संचार करीत होते.अशा काही लोकांवर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचर आदेशाचे पालण करीत अकोट शहर पोलिस स्टेशनचे वाहतूक शाखेने ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली मोकटपणे फिरणाऱ्या दुचाकी वाहन धारकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
कोणतेही काम अथवा गरज नसतांना बरेच लोक दुचाकी वर फिरतांना दिसून येत होते अशा तब्बल 62 दुचाकी गाडी पकडून त्यांच्या गाड्या पोलीस स्टेशनला जमा करून दंडनीय कारवाई केली.
सदर कारवाई एस डी पी ओ सुनील सोनवणे व ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शना खाली 62 वाहन चालकांवर कारवाई करून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. ही कारवाई HC विश्वनाथ शेंडे, Npc सुरज चिंचोळकर, PC गणेश फोकमारे, PC आशिष नांदोकार, PC गोपाल निमकर्डे यांनी केली