अकोला- दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकज संमेलनात अकोला जिल्ह्यातील ३२ जण गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. ह्या सर्व लोकांशी प्रशासनाचा संपर्क झाला आहे. परंतू या व्यतिरिक्त काही लोक असतील अथवा या लोकांच्या थेट संपर्कातील लोक असतील त्यांनी स्वतःहून जिल्हा प्रशासनाकडे माहिती द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. दिल्ली येथील तब्लिगच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनी स्वतःहून माहिती द्यावी.
जिल्हा प्रशासनातर्फे माहिती घेण्याचे काम सुरुआहे. हे लोक अथवा त्यांच्या थेट संपर्कातील लोकांनी माहिती दडवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अशा लोकांची माहिती मिळाल्यास वा स्वतःहून द्यावयाची असल्यास नियंत्रण कक्षाच्या ०७२४-२४२४४४४ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अधिक वाचा: कारागृहातला भाजीपाला अन्नछत्रांसाठी