अकोला: कोरोना संकटाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट संचारबंदी आहे. अकोला जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गित रुग्ण आढळण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्याची जोखीम वाढली आहे. जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासन काटेकोर खबरदारी घेत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कोठेही कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, सामाजिक राजकीय एकत्रिकरण अशा सर्व परवानग्या नाकारलेल्या असून अशा आयोजनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही असा कार्यक्रम, सामुहिक प्रार्थना आदी. होणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले असून असे आयोजन आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.