अकोला: जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी संचारबंदीतून वगळलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आज अखेर ६८६ परवाने दिले आहेत. शासनाचा परिवहन विभाग ही जबाबदारी पार पाडत असतो.
यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत वाहतुकीसाठी ३९० तर राज्यअंतर्गत २३८ तर राज्याबाहेर जाण्यासाठी ५८ पासेस देण्यात आले आहेत. असे तब्बल ६८६ पासेस देण्यात आले असून त्याद्वारे जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न धान्य, औषधे, कृषि माल इ. संचारबंदी आदेशातून वगळण्यात आलेल्या वस्तुंच्या वाहतुकीसाठी परिवहन विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यात मोटारवाहन निरीक्षक खेडकर व मोटारवाहन निरीक्षक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाशी पत्रव्यवहार करण्यासाठी ई-मेल आय डी [email protected] असा आहे. हा संपर्क कक्ष सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.