अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत अन्न धान्याची उपलब्धता करण्यासाठी सासर्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वाटप होणारे एप्रिल महिन्याचे धान्य वितरण सुरु झाले आहे. रेशनकार्ड धारकांनी आपापले कार्ड घेऊन आपल्या स्वस्तधान्य दुकानदारांकडून धान्य घ्यावे. धान्य घ्यावयास जातांना गर्दी करु नये. सोशल डिस्टंस राखावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.