अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत दिव्यांगांना येणाऱ्या अडीअडचणींच्या सोडवणूकीसाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रामेश्वर वसतकार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी ०७२४-२४२४४४४ हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकही स्थापित करण्यात आला आहे.