अकोट (शिवा मगर): कोरोना व्हायरस ने जगात थैमान घातले आहे, चिनपासून हजारो किलोमीटर दूरकोरोना व्हायरस जाऊन पोहचला आहे, त्यामुळे मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा, उद्धव ठाकरे साहेब हे सातत्याने जनतेला घरात राहण्याचं आवाहन करत आहेत, सर्व नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना जीवनावश्यक वस्तू ची गरज पडते म्हणून प्रशासनाने नागरिकांना थोडीशी मोकळीक दिली ,पण या मोकळीक चा काही लोक गैर फायदा घेत असताना दिसून येत आहेत.
अकोट जि अकोला येथे दि 01/04/2020 रोजी बाहेर निघण्याची नागरिका जणू काही मध्ये स्पर्धा लागली होती, अकोट मध्ये सोनू चौक, शिवाजी चौक, जय स्थंभ चौक, यात्रा चौक, कबुतरी मैदान या ठिकाणी सकाळी काही वेळा करिता यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते, लोक बिनधास्त दु चाकी व चार चाकी वाहने मार्केट परिसरात चालवत असताना दिसत होते. विषेश म्हणजे त्यांना अडवण्यासाठी कुठे मधात बॅरिक गेट लावण्यात आले नव्हते, दुपारी 12/30वा नंतर अकोट शहर पोलिसांनी मार्केट खाली करण्यात सुरुवात केली तेव्हा कुठे गर्दी कमी झाली.काही लोक तर तोंडाला मास्क न लावता वावरत असताना दिसत होते, या मुळे शासनाचा
” लॉक डॉउन ” चा उद्देश सफल होणार तरी कसा?या वर प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे, अशी भावना काही नागरिक व्यक्त करीत आहेत.
जीवनावशक वस्तू ची जास्त भावाने विक्री
जीवनावशक वस्तू ची विक्री करत असताना त्या वस्तू चे रेट बोर्ड दुकानाचे प्रथम दर्शनी भागात लावावे असे प्रशासनाने स्पष्ट आदेश आहेत त्यात काही ठिकाणी रेट बोर्ड लावण्यात आले आहे परंतु काही ठिकाणी रेट बोर्ड आणि वस्तू ची प्रत्यक्ष विक्री या मध्ये तफावत दिसत आहे , आणि बऱ्याच ठिकाणी रेट बोर्ड लावण्यात आले नाही, यात जनतेची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे परंतु नाइलाज म्हणून वस्तू ची खरेदी नागरिकांना करावी लागत आहे, हे विशेष!!
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/Lb6ahq3ldnVJCsJgzmEsP1