अकोला,दि.२९ (जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर देशात लागू असलेला लॉक डाऊन पाहता शेतकऱ्यांना आपला शेतीमाल फळे , भाजीपाला इ. वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होत नसल्यास त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी वा कृषि विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. शेतीमालाचे नुकसान होऊ न देणे व त्यांना विक्रीसाठी बाजारापर्यंत पोहोचविणे ह्या सेवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.
पिककर्ज व्यवहारास ३१ मे पर्यंत मुदतवाढ