अकोला – जिल्ह्यात शनिवार अखेर कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसून हिंगोली येथे असलेल्या अकोल्याच्या एका संशयिताचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे तर शनिवारी एक नवीन संशयित सर्वोपचार मध्ये दाखल झाला असून त्याचा अहवाल उद्या मिळणार आहे सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
गत आठवड्याभऱ्यात जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढत असतांना शनिवारी आणखी एक संशयित रुग्ण सर्वोपचार मध्ये दाखल झाला असून आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 संशयितांच्या नमुन्यापैकी सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्याचे चित्र आहे, विमान व रेल्वे सेवा बंद झाल्याने परदेशातून आणि देशांतर्गत येणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात कमी झाली असून मात्र मुंबई व पुणे येथून आलेल्यांची संख्या 15 हजारांच्या घरात आहे आता यात स्वतःला पंधरा दिवस अलगिकरण ठेवून स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 27 ‘निगेटीव्ह’
कोरोनाच्या संशयावरून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या 27 रुग्णांपैकी सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा पॉझिटीव्ह नाही तर शनिवारी एका संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे.त्यामुळे नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
आतापर्यंतची जिल्ह्याची स्थिती
विदेशातून आलेले प्रवासी- 123
प्रशासनाचा संपर्क-122
होम क्वारंटीन- 49
होम क्वारंटीन मुक्त- 74
निगेटिव्ह अहवाल- 27
पॉझिटिव्ह अहवाल- 0
प्रलंबित अहवाल-1