तेल्हारा (किशोर डांबरे)- कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नगर परिषदने सकाळी ८ वा.पासून संध्याकाळच्या ८ वाजेपर्यंत शहरात फवारणी व स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तेल्हारा नगर परिषदने शहरातील बसस्टॅण्ड, शेगाव नाका, पोस्ट ऑफिस, टॉवर चॉक, आठवडी बाजार, मुख्य बाजार पेठ, आणि शहरातील गल्लो गल्ली अशा ठिकाणी फवारणी व स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तेल्हारा नगर परिषदने आदेश दिल्यावर स्वच्छता व अग्निशामन दलांचे विभागाचे संपुर्ण रुपाने शहरात स्वच्छता व फवारणी केली. सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता व फवारणी करण्यात आली असून, तसेच हि मोहिम आता सतत सुरु ठेवावी अशी मागणी शहारवासीयांनी केली आहे.