तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता तेल्हारा शहरात आणि ग्रामीण भागात पुणे मुंबई आदी ठिकाणांहून तेल्हारा शहरात आणि ग्रामीण भागात आलेल्या २२४ लोकांची तपासणी करण्यात आली असून करण्यात आल्याची माहिती तेल्हारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांनी दिली.
राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असुन ,यांचा प्रसार या भागात होवु नये यासाठी नगर पालीका महसुल पोलिस आणि आरोग्य विभाग सज्ज आहेत असे असले तरी मुंबई पुणे नागपूर आदी ठिकाणी कामासाठी शिक्षणासाठी गेलेले नागरिकांचा तेल्हारा तालुक्यात येवा जास्त असुन बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात नगर पालिका आदी ठिकाणी सुरू असुन आतापर्यंत २२४ नागरिकांची नोंदणी व तपासणी करण्यात आली. शिवाय पालीकेने त्यातील १०० च्या वर नागरिकांच्या भेटी घेतल्या अजुनही बरेच नागरिक बाहेर गावाहून आले असतील त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे असल्याची माहिती मुख्याधिकारी मनोहर आकोटकर व तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक तापडिया यांनी दिली. नागरिकांनी घराबाहेर पडु नये स्वच्छता राखावी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तेल्हारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांनी केले आहे.