अकोला- सध्या संपुर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे.कोरोना व्हायरसने आपले पाय पसरले असून आपल्या घरापर्यंत कोरोना येवू नये यासाठी स्वत:पासून सुरुवात करण्याची गरज आहे. सरकारच्यावतीने वारंवार नागरीकांना सुचना देण्यात येत आहे. २१ दिवसासाठी संपुर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातही नागरीकांचा संचारबंदीला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला नागरीकांचा उत्स्पुâर्त प्रतिसाद लाभात आहे.संचारबंदी लागू करण्यात आली असलीतरी नागरीकांना आवश्यक त्या वस्तू घेण्यासाठी ठराविक वेळ जिल्हाधिकारि यांनी काढलेल्या आदेशामध्ये देण्यात आला आहे.विशेष म्हणजे स्थायी तसेच अस्थायी क्षेत्रामध्ये काम करणायांचे वेतन कापू नये,असे निर्देशसुध्दा सरकारच्यावतीने करण्यात आले आहे. नागरीकांना सकाळच्या वेळेला सकाळी ७ ते १२ वाजेपर्र्यंत भाजीपाला दुध इत्यादी वस्तु खरेदी करता येतील तसेच सकाळी ७ वाजतापासून दुपारचे २ वाजेपर्यंत किराणा तसेच धान्याची खरेदी करता येईल त्याचप्रमाणे मेडिकल,रुग्णालये तसेच पेट्रोलपंप सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरीकांना जे आवश्यक आहे ते ठराविक वेळेत घेता येणार आहे.त्यामुळे संचारबंदीचा धसका घेण्याची गरज नाही असे प्रशासनाने म्हटले आहे.शासकीय कार्यालयांमधील गर्दी जिल्हाधिकाNयांनी दिलेल्या आदेशानुसार बरीच कमी झाली आहे. यामध्ये शासकीय तसेच इतर कार्यालयांमध्ये केवळ आवश्यक ते ५ टक्के कर्मचारी कामावर हजर राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. बऱ्याच कर्मचार्यांनी घरबसल्या काम करण्याच्या सुचनासुध्दा देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे संचारबंदीत नागरीकांची अगतिकता पाहून चढ्या भावाने कोणत्याही मालाची विक्री होणार नाही याकडे जिल्हा प्रशासनाचे बारीक लक्ष असल्याचे दिसून येत आह