पातूर(सुनिल गाडगे):- पातुर चे आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सव 2020 संदर्भात यात्रा पंचमंडळ व संस्थान समस्त गावकरी यांच्यावतीने पातुर येथील सिदाजी महाराज संस्थांनचे कार्यालयांमध्ये बैठक संपन्न झाली.
बैठकीमध्ये सर्वानुमते शासनाला सहकार्य म्हणून , कोरोना व्हायरस च्या धर्तीवर हा प्रसार प्रचार होऊ नये, आणि शासनाला सहकार्य व्हावे या दृष्टीकोनातून ?? (?यात्रा महोत्सव रद्द? ) करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे ?? याकरिता दरवर्षी होणारा उत्सवा मधील ➡अखंड हरिनाम सप्ताह, दहीहंडी, भागवत,कीर्तन, संगीत, व महाप्रसाद या सर्व यात्रा महोत्सवातील सर्वच प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत सदर सप्ताह गुडी पाढव्याला सुरुवात होणार होती आणि3एप्रिल रोजी भव्य यात्रा होती.
या यात्रे मध्ये देशातून मोठ्या प्रमाणात भाविक पातूर येथे येत असत यावेळी ही यात्रा बंद ठेवण्यात येणार आहे ?? याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी, पंचमंडळ आणि यात्रा महोत्सव पंचमंडळ संस्थान या सर्वांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की समस्त भाविक भक्तांनी यात्रा महोत्सवा करीता येण्याचे टाळावे अशी विनंती करण्यात येत आहे अशी महत्वपूर्ण बैठक संस्थान कार्यालयामध्ये संपन्न झाली आहे. यावेळी यात्रा पंच मंडळाचे अध्यक्ष महादेवराव गणेशे श्री सिदाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष रामदास खोकले, व राजेंद्रसिह बायस, प्रवीण निलखन, शंकरराव गोतरकार,चंद्रभानजी गाडगे, देवानंद शेवलकार, नारायणराव उगले, शामराव राखोंडे, नारायणराव फुलारी, तुकारामजी ढोणे, रामभाऊ गहिले, प्रकाशभाऊ निमकंडे, महादेव श्रीनाथ, पत्रकार देवानंद गहिले, डी डी सी न्यूज चे पत्रकार किरणकुमार निमकंडे ,विलास धोंगळे, रवींद्र गोतरकार , आदी मान्यवर, भाविक गावकरी उपस्थित होते.
तर पातूर पोलीस ठाण्यात सुद्धा18मार्च रोजी पातूर पोलीस आणि श्री. सीदाजी महाराज यात्रा महोत्सव पंच, सस्थान चे सदस्य यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये राष्ट्रीय संकटात प्रशासन ला सहकार्य करण्याचे आवाहन पातूर ठाणेदार यांनी केले तर यात्रा महोत्सव आणि सस्थान च्या भाविक मान्यवर यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन महादेवराव गणेशे, रामदास खोकले यांनी दिले.
यावेळी प्रा.विलासराव राऊत, मधुकरराव राणे,शंकरराव गोतरकर, मोहन पाटील, प्रवीण निलखन,पत्रकार देवानंद गहिले, पोलीस कर्मचारी रामानंद भवाने, उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0