अकोला:- करोनाच्या उपाययोजनां बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मास्कची साठेबाजी, बनावट सॅनिटायझर निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई तसेच व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा प्रकारे गैरसमज पसरविणारा, खोटा प्रचार, पोस्ट पाठविणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले असले तरी अकोला पोलीस गृहमंत्री यांचे आदेश पाळणार का ? या बाबतीत शंका निर्माण होत असल्याचे वक्तव्य वंचित बहूजन आघाडी प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दिले आहे.
पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलींद भारंबे, कारागृह सुधारसेवा दक्षिण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे उपस्थिती मध्ये मास्कची साठेबाजी, बनावट सॅनिटायझर निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा प्रकारे गैरसमज पसरविणारा, खोटा प्रचार, पोस्ट पाठविणाऱ्यांवर सायबर पोलीसांनी तक्रारी दाखल करुन माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. चुकीचा प्रचार होणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.असे असले तरी अकोला पोलीस ते फार गांभिर्याने घेतील असे दिसत नाही.याची खात्री अकोला येथील पहिल्या संशयित रुग्ण प्रकरणी येत आहे.
सदर युवती करोना पिडीत नसताना तिचे छायाचित्र व केस पेपर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तिचे तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसताना तिची प्रकृति खालावलीअशा अाशयाच्या बातम्या स्थानिक मिडियात प्रकाशित झाल्या होत्या व सोशल मीडियावर ही छायाचित्रे व केस पेपर जिल्हा सामान्य रूग्णालय ॉव वैद्यकीय महाविद्यालय येथून सार्वजनिक करण्यात आली होती.अकोल्यातील ही बातमी असल्याने जिल्हा मध्ये चिंता व भितीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे तरूणीचे कुटूंबाला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला होता.
या प्रकरणी तिचे वडीलांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रभारी अधिष्ठाता, संबंधित विभाग प्रमुख आणि प्रशासन अधिकारी यांचे पद व काहींची नावे टाकून आठवडाभर पुर्वी तक्रार दिली होती. तक्रार घेऊन पोहच देण्यासाठी कोतवाली पोलीसांनी त्यांना बराच वेळ ताटकळत ठेवून ही तक्रार सायबर सेल कडे पाठवुन दिली आहे.अद्याप पर्यंत या प्रकरणी काहीच कार्यवाही न झाल्याने अकोला पोलीस गृहमंत्र्यांनी दिलेले निर्देश तरी गांभिर्याने घेतील की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.कारण अद्याप पर्यंत पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
गृहमंत्र्यांनी बैठकीत वापरलेले मास्क धुवून विक्रीसाठी साठवण केल्याच्या तक्रारी आल्याचे मान्य करीत नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे. पोलीसांनी मास्कची साठेबाजी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच सॅनिटायझर, हॅण्डवॉश आवश्यक प्रमाणात उपलब्ध नसल्याबाबतही तक्रारी व ह्या वस्तूंची चढ्या दराने विक्रीसाठी कोणी कृत्रिम तुटवडा करत असल्यास त्यांच्यावर, तसेच बाजारातील तुटवड्याचा फायदा घेऊन बनावट सनिटायझर, हॅण्डवॉशची निर्मिती, विक्री करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश आहेत.अकोला मध्ये मुदत संपलेल्या सॅनिटाइजर वर स्टिकर लावून चढ्या दरात विक्री झाल्याचा प्रकार मिडीयावर आला आहे परंतु त्यावर देखील कार्यवाही झालेली नसल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेले आदेश अकोला जिल्हा वगळून दिले आहेत की काय ?हा प्रश्न पोलीस आणि जिल्हा सामान्य रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील एकंदर दिरंगाई निमित्ताने राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0