पातूर:- ( सुनिल गाडगे ) दि 12 मार्च 2020 ला पातूर नगर परिषदेला रात्री 11.00वाजता अचानक आग लागल्याने किरकोळ नुकसान झाल्याची घटना घडली येथील नगर परिषदची जुनी इमारत असून त्याच्याच बाजूला नगरपरिषदेची नवीन इमारत बांधण्यात आल्या मुळे जुने इमारतीमधील सगळेच रेकॉर्ड नवीन इमारतीमध्ये दिनांक 15 /11/ 2019 ठराव घेऊन स्थलांतरित करण्यात आले आहे.
त्यामुळे सुदैवाने नगर परिषद चे रेकॉर्ड बचावले तर दिनांक 12 मार्चला रात्री अकरा वाजताच्या सुमारास अचानक जुन्या इमारतीला नागरिक सुविधा केंद्राच्या खिडकी कडून अचानक आग लागली आगी ने उग्र रुप धारण केले तर पातुर नगरपरिषद मध्ये अग्निशमन दलाची गाडी असूनही त्यामध्ये पाणी भरलेले नसल्यामुळे आगवाढतच गेली आणि अग्निशमनदलाची गाडी वेळेवर पाणी भरण्यासाठी गेली त्यामुळे अर्धा ते एक तास आग वाढतच गेलीसदरची आग कोणत्या कारणामुळे लागली असा सवाल होत आहे.
घटनास्थळी पातूरा तील नागरिकांनी धाव घेतली अग्निशमन दलाचा बंब पाण्याने भरून आल्यानंतरआगीवर नियंत्रण करण्यात आले या आगीमध्ये किती नुकसान झाले याचा थांगपत्ता अद्याप तरी सांगता येत नाही आग शॉट सर्किटमुळे लागली की लावली गेली असा सवाल होत आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0