पातुर(सुनील गाडगे)- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राजे शिव छत्रपति ग्रुप पिंपळखुटा यांच्या वतीने श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये दिनांक १०/०३/२०२० रोज मंगळवारला पातुर येथील बाल व्याख्याति कु.शरयु राजू उगले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कु.शरयु उगले हिने शिवचरित्र सांगून गांव कऱ्यांची मने जिंकली तसेच अडगाव येथील पवन पाचपोर यांनी सुद्धा आपले विचार मांडले तसेच महादेवराव देशमुख उर्फ अन्ना यांच्या हस्ते कु.शरयु उगले हिला सन्मान चिन्ह देऊन शरयु चा गौरव करण्यात आला राजे शिवछत्रपती ग्रुप च्या वतीने नेहमीच अश्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
या ग्रुप च्या वतीने गरीब गरजु विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात नेहमी योग्य मार्गदर्शन मिळत असते आणि रक्त तपासणी,रक्तदान असे उपक्रम राजे छत्रपति शिवाजी महाराज ग्रुप च्या वतीने यशस्वी करत असतात या कार्यक्रमा मध्ये सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी असतात मंगळवारला झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव राखोंडे यांनी केले तर सूत्र संच्यालन ग्रुप चे जेष्ठ मार्गदर्शक श्री वासुदेवराव देशपांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्या करिता राजे शिव छत्रपति ग्रुप चे सदस्य तसेच सर्व गावकरी मंडळीने परिश्रम घेतले
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM