तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरातील आजी माजी सैनिकांनी आज नगर परिषद कार्यालय तेल्हारा येथे आजी माजी सैनिकांना मालमत्ता कर व पाणी कर माफ करण्यात यावे या करिता निवेदन देण्यात आले .
भारतीय संरक्षण सेवेत अहोरात्र सेवा देणार्या आजी माजी सैनिका करिता भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या पत्र क्रमांक -२५० ए.सी / पी.ए.३१डी.३८७०/ डी.पी.-सर्विसेस २४७ ३० ३०/०८/२००९ आणि पत्र संख्या क्रमांक डी.पी.व्ही.सी पत्र संख्या टी.आर./०१/३०(डी) ८५/६०० दि. १९/१२/१९८५ अन्वय संरक्षण सेवेतील अर्ध सैनिक /सैनिक व माजी सैनिकाना सर्व साधारण कर व इतर घरपट्टी नळपट्टी माफ करण्यात आली आहे.
तसेच राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय दि ३०/०८/२००९ च्या परिपत्रकाद्वारे आणी संरक्षण मंत्रालयाच्या १९८५ च्या पत्रा नुसार संरक्षण दलातील अर्ध सैनिक ,सैनिक आणि माजी सैनिकांना या महत्वपूर्ण निर्णयानुसार मालमत्ता कर, पाणी पट्टी कर व इतर करातून पूर्णतःह सूट दिली जावी असे सूचित करण्यात आले आहे . लष्करातील सैनिक देशाच्या आणी देशवासीयांच्या संरक्षणासाठी आपल्या परिवारपासून कित्येक वर्ष दूर राहून तसेच प्रसंगी प्राणाची बाजी जाण्यास सदैव तयार असतात .या करिता शासनाकडून मिळणार्या सुविधाची योग्य अंबलबजावणी न झाल्यामुळे वंचित राहत आहेत.
शासनाच्या या निर्णयाची अंबलबजावणी महाराष्ट्रातील अनेक ग्राम पंचायती , नगर पालिका , महानगर पलिका यांनी केली असून पण अद्यापही या निर्णयाची अंबलबजावणी तेल्हारा नगर परिषदेने केलेली नाही त्या मुळे तेल्हारा शहरातील आजी माजी सैनिक शासनाच्या या धोरणापासून वंचित राहत आहेत.
या करिता आज मोठ्या संख्येने आजी माजी सैनिकांनी नगारपरिषद कार्यलय गाठून न.प. मुख्याधिकारी व नगर परिषद अध्यक्ष याची भेट घेऊन लवकरात लवकर या निवेदनाची दखल घेऊन या नियमाची अंबलबजावणी करण्यात यावी ही मागणी करण्यात आली जर येत्या ८ दिवसाच्या आत समाधानकारक सहकार्य न लाभल्यास लोक शाहीच्या मार्गाने आंदोलन करू असा इशाराही या निवेदणा मध्ये करण्यात आला आहे.
तेल्हारा नगर परिषद कार्यक्षेत्रातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने असून देश सेवेसाठी जीवन अर्पित करणार्या सैनीकांचे कर माफ साठी लवकरात लवकर बैठकीमध्ये ठराव घेऊन पाठ पुरावा करू असे आश्वासन नगर परिषद अध्यक्षा जयश्री ताई फुंडकर यांनी दिले आहे . या निवेदना वर राम घंगाळ , राम पाऊलझगडे, सचिन थाटे, विवेक खारोडे , सुरेश जवकार ,कैलास खारोडे , प्रदीप खारोडे,रामदास लासुरकार,नाना इंगळे ,संजय सरोदे , दिनेश माकोडे , अरुण गोमासे , प्रवीण वानखडे अशोक मानकर , कमलाकर दुभाणे ,बजरंग किरणापुरे,नाना धुंडले , दीपक बोंडे ,प्रकाश अम्भोरे , रामकृष्ण मेहरे , रघुनाथ राऊत , सूरज अंबेरे सुरेश तेलगोटे , किरण तेलगोटे , नंदकिशोर दाते , शिवा सरोदे ,सागर निर्मळ ,पंकज कंगटे , प्रकाश सोनोने अक्षय वाईलकर , शुभम इंगळे रूपेश ठाकरे ,सागर मदनकार , गणेश सरोदे , मिलिंद हिवराळे , हीवरळे , पंकज वानखडे ,रोहण मानकर ,अरबाज पठाण अभिषेक ठाकुर , अमोल कांगाटे , सूरज बोदडे , राहुल वानखडे . पंकज मादनकार ,म्हसाये , अरुण हीवराळे , नंदकिशोर ताले , नितिन थाटे आदींच्या स्वाक्षर्या आहेत .
( भारत संरक्षण मंत्रालय पत्रा नुसार अंबालबजावणी करून आजी माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करून सैनिकांच्या सन्मान करावा सैनिकांना नाहक त्रास देऊ नये -माजी सैनिक राम पाऊलझगडे )
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0