तेल्हारा (प्रतिनिधी)- नगर परिषद शाळा नं. १ येथे दि.०३ मार्च ते ५ मार्च तीन दिवशीय बालकांचा कलाविष्कार सोहळा म्हणजेच “बाल महोत्सव” उत्साहात संपन्न झाला. सदरील बालमोहत्सवाचे उदघाटन तेल्हारा नगर परिषदच्या शिक्षण सभापती सौ आरतीताई गायकवाड यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापुजनाने व दीपप्रज्वलन करून झाले
तेल्हारा नगर परिषदेच्या तीनही शाळांचा बालमोहोत्सव पार पडला असून. यामध्ये मैदानी खेळ, सांघिक खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाला असून यामध्ये नगर परिषद शाळा क्र.१, नगर परिषद शाळा क्र.२, नगर परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. तेल्हारा नगर परिषदेच्या शिक्षण सभापती सौ आरतीताई गजानन गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा मोहत्सव पार पडला असून यामुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण समोर येतात असे त्यांनी प्रतिपादन केले. बक्षीस वितरण झाल्यानंतर तीनही शाळेच्या विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देवून आरतीताईंनी विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिली आहे.
यावेळी न पं अध्यक्ष जयश्रीताई फुंडकर, दिपालीताई धनभर,सिमाताई पिवाल,दुर्गाताई भटकर,सुनीताताई भुजबले,नरेश आप्पा गंभीरे,मंगेश सोळंके, गणी शहा, गोवर्धन पोहरकर, सुनील राठोड, ओमभाऊ सुईवाल,माजी मुख्याध्यापक हागे सर, लाटे सर, ,टोहरे सर,अन्नपूर्णा राठोड मँडम, देशमुख मँडम, तीनही शाळेचे मुख्याध्यापक कोपरे सर, तायडे सर, जाफर सर सह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0