उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील अर्थाला परिसरामध्ये एकाच घरात चार मृतदेह अढळून आल्याने एकच खळबळ उडली आहे. साहिबाबा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या संजय कॉलीनीमध्ये राहणाऱ्या धीरज त्यागी या २६ वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांबरोबरच आणि पत्नीची हत्या करुन गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज आणि त्याची पत्नी काजल आपल्या दोन लहान मुलांसोबत भाडेतत्वावर राहत होता. मात्र धीरज आणि काजलमध्ये अनेकदा भांडणे व्हायची. धीरजला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरुन अनेकदा दोघांमध्ये खटके उडायचे. गुरुवारी रात्री उशीरा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात धीरजने पत्नी आणि मुलगी एकता (४) आणि मुलगा ध्रुव (२) यांची हत्या केली. तिघांची हत्या केल्यानंतर धीरजने भिंतीवरच आत्महत्येचे कारण लिहित घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
काय लिहले होते भिंतीवर
धीरजने भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने पत्नीवरील संक्षय व्यक्त केला आहे. “मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करायचो. मात्र ती नेहमी फोनवरुन इतर मुलांसोबत बोलायची. मी तिला याबद्दल अनेकदा समजावले. तसेच माझ्या पत्नीला दारु पिण्याची सवय लागली होती. यासाठी सर्वस्वी तिचे भाऊ जबाबदार आहेत,” असं धीरजने म्हटलं होतं. पत्नीवरील संक्षयाबरोबरच धीरजला आर्थिक चणचण भासत असल्याने त्याने कुटुंबाला संपवल्याचा संक्षयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0