वाडेगाव(डॉ शेख चांद)- येथील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या मोरेश्वर संस्थान जवळ महाजन यांच्या शेतात असलेल्या धुऱ्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळावर रात्री ९ ते १० च्या दरम्यान उघडकीस आली.
येथील शेतकरी अंबादास महादेव सरप यांचा मुलगा नारायण अंबादास सरप वय ३२ हे कामासाठी शेतात गेले असता घरी परत न आल्यामुळे घरामधील नातेवाईक पाहण्यासाठी गेल्यावर नारायण सरप हे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत घटना अशी नारायण सरप हे शेतात गेले होते ते रात्र झाली तरी घरी का नाही आले म्हणून घरच्यांनी त्या शेतकऱ्याच्या फोनवर कॉल केला पण कॉल उचलला नसल्याने त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. नारायण सरप ज्या शेतात गेले त्या शेतात पहायला गेला असता नारायण झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
या घटनेबाबत चुलत भावाने लगेच पोलीसांना माहीती दिली माहिती मिळताच पोलीस चौकीच सहायक पोलिस निरीक्षक महादेव पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल डी जी येऊल, अशोक नवलकार,अमर पवार,योगेश सरप यांनी घटनास्थळ गाठुन घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करीता अकोला येथे रवाना केले. पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत. मृतकाच्या वडीलांच्या नावावर ३ एकर जमीन त्यांच्या आई वडील, पत्नी दोन मुलं,एक भाऊ एक बहीण असा आप्त परिवार आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0