• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळीत २७ मार्च पासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचे सामने,आ.गोपिकीशन बाजोरीया यांचा पुढाकार

Editor by Editor
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळीत २७ मार्च पासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचे सामने,आ.गोपिकीशन बाजोरीया यांचा पुढाकार
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला(प्रतिनिधी)- कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळी येथे 27, 28 व 29 मार्च 2020 रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्या पुढाकाराने या वर्षी ही स्पर्धा होत असून त्याला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केळीवेळी 2020 असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती कबड्डी मंडळाचे संयोजक माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांनी दिली आहे.
27 मार्च पासून सुरु होणाऱ्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी अनेक दिग्गज येणार असून त्यामध्ये पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे, गृहमंत्री ना. अनिल देशमुख, महिला बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकुर, क्रीडा मंत्री ना. सुनिल केदार व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित सीने कलावंत आपली हजेरी लावणार असल्याचे दाळू गुरुजी यांनी सांगितले.
यंदा केळीवेळी कबड्डीचे 78 वे वर्ष असून 1942 साली स्थापन झालेल्या हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ व बहुउद्देशीय संस्थेने नुकताच आपला अमृत महोत्सव साजरा केला आहे. यावर्षी राज्यातील विविध भागातून कबड्डीचे खेळाडू केळीवेळीत दाखल होणार आहेत. महिला आणि पुरुष गटात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीच्या विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसे आणि चषक ठेवण्यात आले आहे. पुरुष गटात प्रथम विजेत्या संघाला एकाहत्तर हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. हे बक्षीस सुप्रसिद्ध व्यापारी खरोटे ज्वेलर्स, अकोला यांच्या कडून देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकाव्वन हजार रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस एकत्तीस हजार रुपये राहणार आहे तर महिला गटात प्रथम बक्षीस एकाव्वन हजार रुपये प्रा. मधुकर पवार यांच्या कडून देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकाचे एकत्तीस हजार रुपयांचे बक्षीस हुसे ज्वेलर्स, अकोला यांच्या कडून तर तृतीत क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे बक्षीस डॉ. प्रा. मुकुंद खुपसे (पाटील) यांच्याकडून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मॅन ऑफ दी मॅचसह विविध प्रकारचे 50 बक्षीसे ठेवण्यात आली आहेत अशी माहिती दाळू गुरुजी यांनी यावेळी दिली.
विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावे आ. चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत असून कबड्डी प्रेमी जणांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. केळीवेळी गावाने क्रीडा क्षेत्रात कबड्डीमुळे आपले नावलौकिक केले असून देश गौरवासाठी देश-विदेशात आपले खेळाडू पाठविले आहेत. पाऊन शतकाची ही परंपरा अशीच कायम असून या गावाला अनेकांनी साथ दिली आहे. या वर्षीचा राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर, उद्योजक स्व. राधाकिसन व स्व. अंगुरीदेवी बाजोरिया, मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू स्व. पुंडलीकराव अवचार व स्व. संजय हिवरे (गुरुजी), यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला आहे. दि. 27 मार्च 2020 रोजी सायंकाळी केळीवेळीच्या मैदानावर भव्य उद्‌घाटन सोहळा होणार असून 29 मार्च पर्यंत ही स्पर्धा रोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत खेळल्या जाणार आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आ. गोपीकिशन बाजोरिया व माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, माजी आ. डॉ. जगन्नाथ ढोणे, मंडळाचे अध्यक्ष गजानन मोंढे, ‌माजी जि.प. सदस्य ज्ञानदेवराव परनाटे, माधवराव बकाल व मंडळाचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post

९० किलो गोमांस जप्त; बाळापूर पोलीसांची कारवाई

Next Post

रखडलेल्या तेल्हारा हिवरखेड रस्त्याच्या बांधकामाच्या धुळी मुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तेल्हारा-हिवरखेड-रस्त्याच्या-बांधकाम,शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

रखडलेल्या तेल्हारा हिवरखेड रस्त्याच्या बांधकामाच्या धुळी मुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Our akola

सर्व अवैध धंदे बंद करा अन्यथा रास्तारोको,अनुचित प्रकार घडल्यास पोलिस व महसूल विभाग जबाबदार- युवक कांग्रेस

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.