दानापूर (सुनिलकुमार धुरडे)- दानापूर एक्सप्रेस म्हणून भारत भर नाव गाजवणाऱ्या अर्चना अढाव ला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला.
जगाच्या क्रीडा नकाशावर अकोला जिल्हाल्या स्थान मिळवून देणारी दानापूर एक्स्प्रेस अर्चना अढाव ने आयुष्याच्या खडतर ट्रॅकवर धावत अनेक शिखरे गाठली आहेत. क्रीडा क्षेत्रातील ही रणरागिणी आणखी यशाचे तुरे रोवेल यात शंका नाही.
तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे वाण नदीच्या तिरावर वसलेले गाव याचं गावात अठरारविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबात अर्चनाचा अढाव चा जन्म 14 जुलै1995 ला झाला.
अर्चना अडीच महिन्याची असतांना अर्चनाचे वडिलांचे छत्र हरवले मात्र अर्चनाच्या आईने खचून न जाता अर्चना सोबतच तिच्या दोन मोठ्या बहिणीचे शिक्षण व लग्न करून दिली .
अर्चनाचे शिक्षण हे येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत झाले . तिला संघर्ष करण्याचा गुण आई कडूनच मिळाला होता.नंतर तिला पाचव्या वर्गात येथील हनुमान प्रसाद साह जनता विघालयात दाखल करण्यात आले व येथूनच तिच्या कारकिर्दीने यशाचा ट्रक पकडला.तालुका, जिल्हा, राज्य स्तरीय व पाहता पाहताआंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली .तिच्यातील सुप्त गुण बघून हनुमान प्रसाद साह जनता विघालयाचे व्यवस्थपक डॉ अजेय विखे यांनी तिला आर्थिक सहकार्य करून पुण्यातील बालेवाडी क्रीडा प्रबोधनीत दाखल केले.
या तिच्या आयुष्या चा खरा टर्निंग पॉईंट ठरला. व त्या नंतर तिने कधीही मागे वळून न पाहता देशा साठी ऑलम्पिक ही खेळली .
जिल्ह्याचे, तालुक्याचे व गावाचे नाव आज परत एकदा अर्चनाने उजवल केले आहे.
येत्या बावीस तारखेला अर्चनाला हा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
अर्चनाची कारकीर्द
1)चीन मध्ये ज्यनिअर आशियाई अजिक्य पद स्पर्धेत 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक
2)अमेरिकेतील जागतिक ज्यनिअर स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व
3)पटियाला येथे आयोजित वरिष्ठ फेडरेशन षचक स्पर्धेत 800 मीटर मध्ये सुवर्णपदक
4) भुवनेश्वर येथिल आशियाई स्पर्धेत सहभागी
5)राष्टीय स्पर्धेत 1500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक.
आज अर्चनाला पुरस्कार जाहीर झाला हे ऐकून खूप आनंद झाला.तिने दानापूर गावाची ओळख आज परत एकदा सम्पूर्ण महाराष्ट्रात केली आहे. व आमच्या विघालयाला अर्चनाचा अभिमान आहे.
डॉ, अजेय विखे
व्यवस्थापकहनुमान प्रसाद साह जनता विघालाय दानापूर.
मला अतिशय आनंद होत आहे की मला आज महाराष्ट्र शासनाने शिव छत्रपती शिवाजी महाराज राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट खेळाडू म्हणुन मिळतोय याने मी अजून प्रोत्साहीत होत आहे. मी अतिशय जिद्दीने पुढील आवाहने पार पडील माझा आनंद आज गगनात मावेनासा आहे.
अर्चना अढाव
आंतराष्ट्रीय धावपटू, दानापूर.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0