हिवरखेड(धीरज बजाज)- नागरिकता संशोधन कायदा सी.ए.ए. च्या समर्थनार्थ हिवरखेड येथे राष्ट्रीय सुरक्षा मंच द्वारे 11 फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतातील अल्पसंख्यांक लोकांना ह्या विधेयकापासून कोणताही धोका नाही. फक्त पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या राष्ट्रांमध्ये अल्पसंख्यांक म्हणून अनन्वित अत्याचार झालेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिश्चन धर्मीय बांधवांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि स्वातंत्र्यापासून निर्माण झालेल्या व प्रलंबित असलेल्या समस्येला प्राथमिकता देऊन राष्ट्रहितार्थ कणखर निर्णय घेतल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन आणि समर्थन करण्याच्या हेतूने सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅलीचे आयोजन आज सोनवाडी फाटा हिवरखेड येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. मेन रोड मार्गे कालीपिली स्टॅन्ड पर्यंत रॅलीचा मार्ग होता. कालीपिली स्टँडवर पोहोचल्यानंतर राष्ट्रगीत द्वारे रॅलीचे समापन करण्यात आले. या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे शेकडो मीटर लांब तिरंगा घेऊन अनेक युवक सहभागी झाल्याने रॅलीमध्ये वेगळीच रंगत आली होती. देशभक्तीपर गीतांचा निनादात सदर रॅली निघाली होती आणि हजारो युवकांनी देशभक्तीपर नारे लावल्याने संपूर्ण हिवरखेड नगरी देशभक्तीच्या रंगात रंगून गेली होती. सी.ए.ए. समर्थनार्थ भव्य रॅलीला हजारोंच्या संख्येने देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते. सदर रॅली शांततेत पार पाडण्यासाठी आकोट उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड ठाणेदार आशिष लवंगडे, आकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड, तेल्हारा ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि आरसीपी प्लाटून इत्यादींनी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8