अकोला – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाने मिळविलेला नेत्रदीपक विजय हा देशातील राजकारणाने घेतलेले विधायक वळण असून दिल्ली मधील जनतेने भाजपा आणि संघाचा विघटनवादी अजेंडा नाकारला असून देश आता नकारात्मक विचारधारेला वेसन घालायला सुरुवात झाली आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे.
दिल्लीत ७० पैकी ६३ जागांवर आपने विजय मिळवला आहे. निवडणुकीत प्रचाराचा घसरलेला स्तर, देशातील नागरिकांना देशद्रोही ठरविणे, दहशतवादी बोलणे, गोळ्या घालण्याची भाषा करणे ही बाब कुणालाही रूचली नाही. मोदी, शाह, योगी यांच्या बेलगाम वक्तव्यामुळे संपूर्ण दिल्लीकरांनी भाजपची तिरडी बांधणारा निकाल दिला आहे. या निवडणुकीत ४०० खासदार, ८ मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, सर्व केंद्रीय मंत्री, हजारो प्रचारक तसेच सत्तेचा बेलगाम वापर करून सुध्दा भाजपला ७ जागांवर विजयी होता आले. या निकाला मधून भाजपने धडा शिकण्याची गरज असून व्देष व विघटन करणारी व मग्ररूरीची भाषा आता सहन केली जाणार नाही, हे अधोरेखित झाले असून एनआरसी, सीएए, एनपीआर तसेच महागाई, बेरोजगारी या विषयावर जनतेने भाजपला पुर्ण नकार दिला आहे.
जामिया व जेएनयू विद्यार्थ्यांवरील बर्बर लाठीहल्ले, शाहीनबाग आंदोलकांना देश विरोधात दर्शविणे यामुळे भाजपला केवळ ४ जागांचा लाभ झाला असला तरी केवळ ७ जागांवर विजय मिळाला असून दोन आकडी संख्या देखील गाठता आले नाही. हा दारूण पराभव शाह, योगी व ठाकुर प्रवृत्तीला लोकशाही पद्धतीने देण्यात आलेले सणसणीत ऊत्तर असून देशात विघातक प्रवृत्तीला या पुढे स्थान नसणार हे पक्के झाले आहे. असाही आशावाद वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केला.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM