अकोला : – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार दिंनाक ८ फेब्रुवारी २०२० रोजी अकोला जिल्हयातील सर्व दिवानी व फौजदारी न्यायालये येथे तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, औद्योगीक न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला जिल्हयातील विविध तालुका न्यायालयात यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची तसेच मोटार वाहण अपघात प्रकरण व कलम १३८ एम. आय. अॅक्ट अशा प्रकरणात प्रलंबीत असलेल्या प्रकरणांपैकी एकूण ५८८० प्रकरने राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सुनावणीकरीता प्रस्तावीत करण्यात आली होती. त्यापैकी ३८० प्रकरणात समेट घडून आला. त्यातील एकूण तडजोड रक्कम रूपये ४,२०३७,७१७ (रूपये चार करोड वीस लाख सदोतीस हजार सातसे सतरा फक्त) वसुल झाले .
लोकन्यायालयामध्ये सर्व पॅनलवर पॅनल सदस्य म्हणुन न्यायाधिस, अधिवक्ता व समाजसेवक यांनी काम पाहीले तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी मदत केली.
लोक न्यायालय यशस्वी होणेकरीता श्री वाय. जी. खोब्रागडे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अकोला तसेच जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री एच. के. भालेराव साहेब यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचीव श्री स्वरुप एस. बोस यांनी अथक परिश्रम घेतले तसेच जिल्हा न्यायालय, अकोलाचे प्रबंधक श्री ए. एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोलाचे अधिक्षक श्री सज्जाद अहमद, श्रीहरी टाकळीकर, वरीष्ठ लिपीक, व्ही. आर. पोहरे, कुणाल पांडे, कनिष्ठ लिपीक व मो. शरीफ, शाहबाज खान, शिपाई, यांनी परिश्रम घेतले तसेच विधी स्वयम सेवक डॉ शेख चांद, राजेंद्र डोंगरे, निशांतराव, अमर खडे, मो. रशीद, पळसपगार, भारत गोपनारायण, शाहनवाज खान इत्यादींनी सहकार्य केले. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचीव श्री स्वरुप एस. बोस यांनी कळविले आहे.