अकोट (सारंग कराळे)- राष्ट्रीय सुरक्षा मंच आकोट च्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी रोजी रॅली काढण्यात येणार आहे. या संदर्भात ४ फेब्रुवारी रोजी स्थानिक कबुतरी मैदान येथील सभागृहात नियोजन सभा पार पडली. रॅली व सभे विषयी प्रमुख उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
सभेमध्ये उपस्थितांनी चर्चा केली.
अकोट शहरात ९ फेब्रुवारी रोजी ३ वाजता सी.ए.ए.समर्थनार्थ रॅली व सभेचे आयोजन राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोट च्या वतीने करण्यात आले आहे. सदर रॅली नेहरु पार्क बस स्टॅन्ड समोरुन प्रारंभ होऊन शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, सोनू चौक, याकूब पटेल चौक, यात्रा चौक मार्गे नरसिंग महाराज मंदिर पटांगण येथे सभा व समारोप होईल. त्यानंतर शिष्टमंडळाव्दारे सी.ए.ए.समर्थनार्थ उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येईल. तरी सी.ए.ए.समर्थक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हजारोच्या संख्येने रॅली व सभेत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोट यांनी केले आहे.
सध्या देशभरात सीएए विरोधात दुष्प्रचार होत असल्याने देशातील राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बंधुभावाला बाधा पोहचत आहे. देशामध्ये जाणीवपूर्वक सीएए विरोधात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरविण्यात येत आहेत. मुळात हा कायदा कोणाच्याही विरोधात नसुन अफगाणीस्तान, पाकीस्तान व बांग्लादेश या तीन देशातील अल्पसंख्यकांना भारताचे नागरिकत्व देण्याविषयी हा कायदा आहे. त्यामुळे या कायद्याने कोणाचेही अहित होणार नाही. या संदर्भात व्यापक जनजागृती होण्याकरिता ही रँली काढण्यात येत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM