आकोट (देवानंद खिरकर)- तालुक्यातील नामांकीत सावरा येथील श्री महारुद्र संस्थानच्या कार्यकारी विश्वस्तांनी संस्थानचा सर्व रेकोर्ड आदि इतर पाच विश्वस्तांच्या ताब्यात देण्याचे आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत.
आकोट तालुक्यातील सावरा येथील श्री महारुद्र संस्थान नामांकीत संस्थान आहे. संस्थानच्या सहा पैकी पाच विश्वस्तांनी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त बाबुराव मारोती सपकाळ यांनी संस्थांमधिल इतर विश्वस्तांना विश्वासात न घेता पुर्वी गावकरी लोकांच्या सम्मतीने संस्थानावर विश्वस्त येण्याची रित यामध्ये बदल करुन रेकोर्ड नेजिंग ट्रस्टीच दुसरा ट्रस्टी नेमावा असा बदल करुन घेतला. तसेच कोणताही ठराव न घेता, कोणतीही कायदेशीर प्रक्रीया न राबविता सांस्थानच्या इतर ५ ट्रस्टींना विश्वस्त पदावरुन कमी करण्याचा अर्ज केला.
तसेच संस्थानचे सर्व रेकोर्ड, चल संपत्ती घरी नेली. बाबुराव सपकाळ मनमर्जी प्रमाणे व बेकायदेशीर पणे काम करीत आहेत त्यामुळे कृत्यांच्या या नियमबाहय, कारभाराबाबत आदेश होऊन सर्व रेकोर्ड व चल संपत्ती संस्थानच्या ताब्यात द्याव्यात असा अर्ज रमेशराव महल्ले यांचेसह इतर पाच विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांकडे दाखल केला होता त्यावर सुनावणी होऊन सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी महल्ले यांच्या सह इतर पाच विश्वस्तांचे म्हणने ग्राहय धरीत त्यांचा अर्ज मंजुर केला तसेच संस्थानचे सर्व रेकोर्ड अर्जदार विश्वस्त यांना रामभाऊ राजाराम सोनोने यांचे उपस्थीतीत सात दिवसाच्या आत ट्रस्टच्या आवारात हंस्तांतरीत करावा. त्याचप्रमाणे सहा. धर्मदाय आयुक्तांनी संस्थानचा सर्व रेकोर्ड चल संपत्ती रामभाऊ सोनोने च्या देखरेखी खाली संस्थानच्या आवारात सुरक्षीत ठेवण्यात याव्यात असे सुध्दा विश्वस्तांना निर्देशीत केले आहे.
तसेच संस्थानमधिल दान पेटी, चल संपत्ती, शेती, खाते आदि काम संस्थानला घटना लावण्याचा अर्जाचा निकाल लागेपर्यत संस्थानचे विश्वस्त रामभाऊ सोनोने पाहतील,यामध्ये काही अडचण निर्माण झाल्यास पुन्हा धर्मदाय आयुक्त धाव घ्यावी असे देखील सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे.पाच विश्वस्तांतर्फे रेकोर्ड निलेश मरकाडे याःनी तर सपकाळ तर्फे रेकोर्ड. सुभाष मुंगी यांनी काम पाहिले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM