अकोला(प्रतिनिधी)- अकोला महापालिका मध्ये भाजपच्या महापौर आणि पदाधिकारी यांनी जनतेवर लादलेल्या २०० टक्के टॅक्स वाढीच्या संघटीत लुटीला ऊच्च न्यायालयाने चाप लावला असून ह्या मागील सुत्रधारांना व असेसमेंट करून टॅक्स वसुल करणा-या कंपनी संचालक यांना अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून संघटीत लुट करण्यासाठी भाजपा पदाधिकारी यांनी अकोलेकरांवर अव्वाच्या सव्वा करवाढ लादली होती. या मध्ये मोठ्या प्रमाणात सेटिंग करण्यात आली होती.टॅक्सवाढी विरोधात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मनपावर मोर्चा काढण्यात आला होता.वाढीव कराच्या विरोध करीत बाळासाहेबांनी जूनाच घरकर भरून या दरवाढीचा निषेध केला होता.अनेकांनी या विरोधात आंदोलन ऊभारली होती.तरीही भाजपा च्या सत्ताधारी पदाधिकारी यांनी सक्तीने कर वाढीची वसुली केली.डॉ झिशान हुसैन यांचे याचिकेमुळे पालिका प्रशासन तोंडघशी पडले तरी देखील करवसुली जबरदस्ती सुरू होती.मनपा प्रशासनाच्या वतीने दाखल केलेल्या पुर्नविचार याचिकेवर देखील न्यायालयाने करण्यात आलेली करवाढ व त्यावरील निर्णय कायम ठेवला आहे.
परिणामी स्थानिक स्वराज्य संस्था लुटून खाणा-या प्रवृत्ती उघड पडल्या आहेत.ह्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.ही नियमबाह्य करवाढ व वसुलीची चौकशी करून ह्या मागील मास्टर माइंड व त्या मधील कमिशनखोरी करणारांना गजाआड करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी चे वतीने मनपाला कुंड्यात लावलेली बेशरम झाडे दिली जातील असा इशारा देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8