तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन काल रात्री शहरातील मेन रोडवरील मुख्य मार्केट च्या चार दुकाने फोडून चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आवाहन केले आहे.
शहरातील मुख्य मार्गावर असलेले मुख्य मार्केटमधील चार दुकाने काल रात्री चोरट्यानी टार्गेट करून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पानटपऱ्या फोडून मुद्देमाल लंपास केला होता. काल रात्री नगर परिषद ला लागून असलेल्या योगेश किराणा, पंचायत समिती जवळील बागणी किराणा, शिवाजी विद्यालयाजवळील शिवम कन्फेक्शनरी, शेगाव नाका येथील सती एजन्सी ही दुकाने फोडली यामध्ये हजारो रुपयांची नगद तसेच मुद्देमाल लंपास केला.
यावेळी दुकानांमध्ये लागलेल्या सी सी टी व्ही मध्ये चोरटे आले असून रात्री पावणे तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी चोरीचा उद्देश साध्य केला. तेल्हारा पोलिस त्यामाध्यमातून तपस करीत आहे. ठाणेदार विकास देवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
तेल्हारा शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून गस्त नेमकी कशा प्रकारे केली जाते जर मुख्य मार्गावरील आणि हाकेच्या अंतरावर असलेले दुकाने टार्गेट होत असताना पोलीस नेमकी कोणती अन कशी गस्त घालत आहेत असा प्रश्न व्यावसायिक वर्ग करीत आहे. या घटनांमुळे व्यावसायिक वर्ग मात्र भयबीत झाला आहे.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/I2tvT2AFMKnDagGDyS56n4