वाडेगाव (डॉ शेख चांद)- वाडेगाव येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत दिनांक २० व २१ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले या दोन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस असे कलाविष्कार सादर करून उपस्थित पालक व पाहुण्यांची मने जिंकली.
यावेळी स्नेहसंमेलनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक समाधान सोर, हे होते तर प्रमुख अतिथीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष डॉ शेख चाँद, मानिकराव मानकर, ज्ञानेश्वर पुंडकर, संदीप घाटोळ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस सुबोध घ्यारे, श्रीकृष्ण घाटोळकर, सौ सुरेखा बावणे, गजानन खोडके, सौ महानंदा जजांळ, सौ शारदा गावंडे, सौ संगीता सरकटे, सौ वंदना टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रथम स्वरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले त्यानंतर नर्सरी, के जी वन, के जी टु च्या चिमुकल्यांसह इयत्ता ६ ते ८ वी मधिल विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गित, भावगीत, कोळीगीत, मराठी तसेच हिंदी गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले.
त्यानंतर मंगळवार २१ जानेवारी रोजी ” ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था ” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी १ ली ते ५ वी मधील विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव, देशभक्तीपर गीत, लोकगीत कोळीगीत, मराठी आणि हिंदी गीतांवर एकापेक्षा एक सरस असे नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली त्यांनतर वर्ग २ रा (ब) मधील विद्यार्थ्यांनी नाटीकेद्वारे बॉर्डरवरील चित्र प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर ठेवले यावेळी नाटिका पाहून उपस्थितांमधिल अनेकांचे डोळे पाणावले होते.
त्यानंतर ” मै मिट्टी मे मिल जावा ” या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन कु.वृषाली धनोकार, कु. स्वाती घाटोळ, सौ सुनंदा जावरकर, सौ.अनुराधा शेंडे यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी पालक तसेच महीलाची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती तसेच कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.