अकोट(सारंग कराळे)- अवकाळी पाण्या मुळे झालेल्या शेतीपिकांचा नुकसानाची भरपाई म्हणुन हेक्टरी ८ हजार रुपये मदत मागील २ महिन्यान पासुन जमा झाल्यावर सुद्धा शेतकऱ्याचा खात्या मध्ये वळती करण्या संबंधी आदेश असल्यावर सुद्धा शाखा अधिकारी कुठलीच कारवाई करत नसल्या मुळे आज प्रहार जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी बँक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच आदिवासी बांधवांचा अशिक्षित असण्याचा फायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून त्यानाच्या इंशोरन्स पॉलिसी काढण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
एका आदिवासी व्यक्तीचा खात्या मध्ये ३० हजार असल्यावर २० हजाराची पॉलिसी काढण्यात आली तीन महिन्यात पैसे तिपट होतील असे सांगुन कारवाई करण्यात आली त्यामुळे आदिवासी बांधवांची दिशाभुल करून त्यांची आर्थिक लुट थांबवावी व शेतकऱ्यांना त्रास दिला तर प्रहार axis बँके विरुद्ध आंदोलन केल्या शिवाय राहणार त्या संबंधी निवेदन देवून लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले या वेळी प्रहार जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर कुलदीप वसु समीर जामदार तसेच बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते.