पातूर (प्रतिनिधी)- शुक्रवार दिनांक 17/01/19. रोजी पो. स्टे. पातूर सीमेतील “जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा (आंतरराष्ट्रीय), दिग्रस बु” SWAS टीमची कायदेविषयक कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमामधे पो. कॉ. गोपाल मुकुंदे ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना “महिला व विद्यार्थी सुरक्षा” ह्या विषयावर क़ायदेविषयक मार्गदर्शन केलेे. महिला पालक यांना कायदेविष् यक महत्वपूर्ण माहिती देण्यात आली सोबतच आपल्या मुलांची व आपली सुरक्षा बाबत मार्गदर्शन करुण त्यांना कायद्याची हळद व स्वरक्षांचे कुंकु असे वान अकोला पोलीस दल SWAS टीम व शाळेच्या माध्यमातून देण्यात आले. कायदा सर्वाना माहिती असणे ही काळाची गरज जाली आहे असे मत स्वास टीम चे गोपाल मुकुंदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री. बरडे सर, माता पालक, जेष्ठ महिला नागरिक, गावकरी मंडळी, शिक्षकवृंद व पो. कॉ. विशाल मोरे ह्यांची उपस्थिती होती.