वाडेगांव (डॉ शेख चांद)- दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी गुलाम नबी ऊर्दु हायस्कुल येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनी चे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष गुलाम जैनुल आबेदीन सर यांच्या हस्ते करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सैय्यद कमरोद्दीन सर शाळेचे सचिव हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे मुख्याद्यापक डॉ जी एम शाबोद्दीन,शाळेचे उपाध्यक्ष कयुम सर, माझी मुख्याद्यापक मो. जमीर सर, माझी शिक्षक शेख सलीम सर, डॉ. शेख चांद, काझी मुझफर बेग, शेख बिस्मीला, रफीक भाई, हमीद शारीक सर इत्यादी उपस्थीत होते.
शाळेतील ५ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यानी ६५ मॉडेल तयार केले होते. या मध्ये मुलींची संख्या जास्त होती. जवळ पास ५० मॉडेल मुलींनी तयार केले होते. या वरून असे सिद्ध होते की मुस्लीम मुली ही शैक्षणिक क्षेत्रात पुढे येत आहेत. या विज्ञान प्रदर्शनी साठी मुख्याद्यापक डॉ जी एम शाबोद्दीन, विज्ञान शिक्षक अय्युब खान सर, गणित शिक्षक मों. फारूख सर यांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनीला सलीम सर, मुस्ताक सर, गुलाम हुसेन सर, मुझफर खान सर, सनाऊल्ला खान सर, निखत मॅडम, शहारे मॅडम, सलमान सर, गुलाम खॉजा, अ. वाजीद, सैय्यद हाशम, यांनी सहकार्य केले. यावेळी परीसरातील इतर शाळेतील विद्यार्थांनी भेट दिली.