अकोला(प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखा अकोला दिनांक 11।1।20 ते 17।1।20 पर्यंत रास्ता सुरक्षा सप्ताह साजरा करीत आहे, त्या अंतर्गत रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्या साठी वाहन चालकां मध्ये जागृती यावी म्हणून सुरक्षित वाहने चालवा व आपला जीव वाचवा ह्या अभियाना अंतर्गत वाहतुकीचे नियम समजावून सांगण्या साठी एकीकडे धडक मोहीम व जनजागृती सुरू आहे.
त्या अंतर्गत आज दिनांक 15।1।20 रोजी अकोला शहरातील बस स्टँड, तसेच प्रमुख चौकात कॉर्नर मीटिंग आयोजित करून सुरक्षित रित्या वाहने चालवून आपण अपघात कमी करू शकतो त्या साठी कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे तसेच असुरक्षित वाहने चालविण्याचे दुष्परिणाम सांगणारे माहिती पत्रक वितरित करण्यात आले, तसेच ऑटो व सायकल रिक्षा वर रिफ्लेक्टर लावण्यात आले, सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक कर्मचाऱ्यांनी पार पाडली।