हिवरखेड(धीरज बजाज)- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आणि अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अडगाव बु. येथे उधारीच्या पैशावरून एकाच समुदायातील दोन गटांमध्ये हाणामारी होऊन पाच जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि अतिरिक्त पोलिस कुमक बोलवावी लागली यावेळी अडगावला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख इस्माईल शेख सत्तार याने जाकिर अली अजमत अली यांच्याकडे किराणा दुकानची उधारी पंधराशे रुपये मागितले. त्या कारणावरून 13 जानेवारी सोमवार रोजी सकाळी उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून वाद झाला शिवीगाळ करून आरोपींनी पाईप व तलवार घेऊन घरासमोर येऊन मारहाण व शिवीगाळ केली या प्रकरणी इब्राहिम खॉ भांडण सोडविण्यास गेले असता त्यांना काठीने पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले अशी फिर्याद शेख इस्माईल शेख सत्तार यांनी हिवरखेड पोलिसांकडे दिली सदर फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी जाकिर अली अजमत अली, अजीम अली अहमद अली, सुमेर अली अहमद अली, मुमताज खॉ उर्फ लाला गुलाब खॉ, सखावत अली नजाकत अली, सर्व आरोपी आडगाव बुद्रुक येथील राहणारे आहेत यांच्याविरुद्ध कलम 143 147 148 149 307 504 506 भारतीय दंड विधान नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याच प्रकरणी जाकिर अली अहमद अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी शेख इस्माईल शेख सत्तार, शेख ईसाक शेख इस्माईल, शेख इब्राहिम शेख सत्तार, शेख रिजवान शेख इब्राहिम, राजूचा मुलगा फिरोज खॉ, यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 143 147 148 149 307 504 इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पुढील तपास ठाणेदार आशिष लवंगडे, विठ्ठल वाणी, गोपाल दातीर, पांडुरंग राऊत, आकाश राठोड, नीलेश खंडारे, इत्यादी करीत आहेत. ह्या प्रकरणानंतर अडगाव बु. येथे तणावपूर्ण शांतता असल्याचे सूत्रांनी सांगितले.