तेल्हारा(योगेश नायकवाडे)- एम एस इ वर्कर्स फेडरेशन आणि सब ऑरडीनेट इंजिनिअर असोसिएशन तर्फे वीज कामगार कायदा2018 च्या विरोधात पुकारण्यात आलेल्या संपात वर्कर्स फेडरेशन तेल्हारा आणि सब इंजिनीअर असोसिएशन तेल्हारा शाखेच्या पदाधिकारी आणि सभासद यांनी संपात सहभागी होऊन केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज कायदा 2018 च्या विरोध दर्शविला, दि 8 जाने 2020 रोजी महावितरण उपविभागीय कार्यालय समोर झालेल्या निषेध द्वारसभेला एम एस इ वर्कर्स फेडरेशन अकोला झोन सदस्य कॉ निलेश मगर, एस इ ए चे तेल्हारा शाखेचे अध्यक्ष अभियंता श्री आकाश गुप्ता,श्री आकाश पांचभाई साहेब, श्री पंकज गुहे साहेब, श्री अखिल कुमार साहेब,श्री प्रवीण जाधव साहेब, कु कल्याणी गावंडे मॅडम, कॉ योगेश राऊत, कॉ नरेंद्र वानखडे यांनी द्वार सभेला संबोधित केले, प्रस्तावित कायद्याने मोठी कामगार कपात होणार असून सर्व सामान्य माणसाला सुद्धा या कायदयची झालं बसणार असल्याचे सांगितले,तेल्हारा मध्ये संपात फेडरेशन व इंजिनीअर असोसिएशन च्या सभासदांनी संपात 100 टक्के उपस्थिती लावली हे विशेष, यावेळी द्वारसभेला एम एस इ तेल्हारा वर्कर्स फेडशन चे शाखा अध्यक्ष कॉ अमित सातळेकर ,कॉ गणेश उज्जैनकर,सचिव कॉ अफसर शाह,कॉ कमलेश गासे, कॉ किशोर मालगे, कॉ संजय राहटे, कॉ सुनंदा काळे,कॉ उमेश जावकर,कॉ अरविंद मोरोकार, कॉ पवन चोपडे, कॉ अक्षय राऊत, कॉ संजय माकोडे, कॉ संदीप शेकोकार, कॉ अमोल आढाऊ, कॉ उमेश तायडे,कॉ अतुल काळे,कॉ रमेश चंदन, कॉ मनोज म्हसाल सहित एम एस इ वर्कर्स फेडरेशन आणि सब इंजिनीअर असोसिएशन चे सदस्य उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ अफसर शाह व आभार प्रदर्शन कॉ किशोर मालगे यांनी केले.