अकोला (डॉ शेख चांद)- आज जिल्हा न्यायालय अकोला येथे आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय. जी. खोब्रागडे सर यांचे मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पन करण्यात आले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय. जी. खोब्रागडे सर, जिल्हा न्यायधीश – १ श्रीमती एम. आय. आरलँड मॅडम, जिल्हा न्यायधीश – २ श्री एच. के. भालेराव, जिल्हा न्यायधीश – ३ श्री डी. बी. पतंगे, जिल्हा न्यायधीश -४ श्री डी.पी. शिंगाडे, जिल्हा न्यायधीश – ५ श्री ए. के. शर्मा, तदर्थ जिल्हा न्यायधीश – १ एन. जी. शुक्ल, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण चे सचिव स्वरूप बोस, तसेच इतर न्यायधीश यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी कार्यक्रमाला बार असोसीयन चे अध्यक्ष, सचिव, पदाधीकारी, अॅडव्होकेट मंडळी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधीकरन चे कर्मचारी, विधी स्वयम सेवक, इत्यादी उपस्थीत होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधीकरण चे सचिव स्वरूप बोस यांनी केले, मार्गदर्शन पर आपले मनोगत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय. जी. खोब्रागडे सर, जिल्हा न्यायधीश – १ श्रीमती एम. आय. आरलँड मॅडम, यानी विशेष माहिती देवून कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याच प्रमाने पी पी नातू मॅडम, जे वाय मस्के मॅङम, अॅड. वैशाली गवई , अॅड. आम्रपाली गोपनारायण, अॅड. गजानन खाडे यानी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच आज जिल्हा न्यायालय अकोला येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार विशाल पोहरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण चे सचिव स्वरूप बोस, सज्जाद खान अधीक्षक, वरीष्ठ लिपीक टाकळीकर दादा, व लिपिक विशाल पोहरे व कुणाल पांडे क लिपिक तसेच शरीफ भाई शिपाई आणि विधी स्वयं सेवक यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.