वाडेगांव(डॉ शेख चांद)- श्री बालाजी इंग्लीश स्कुल वाडेगांव येथे स्नेहसंमेलन दिनांक २८ डिसेंबर २०१९ ते १ जानेवारी २०२० पर्यंत आयोजीत करण्यात आले होते . यामध्ये दिनांक २८ ला पालकांचे विविध खेळ, आजी -आजोबा मेळावा, रांगोळी स्पर्धा व डिश डेकोरेशन स्पर्धा, दि . ३० ला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
३१ डिसेंबर रोजी सांस्कृतीक कार्यक्रम, फॅशन शो व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे उद्दघाटन मा. श्री गौतम बडवे , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बाळापूर यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष श्री विलास वरोकार हे होते तसेच दिपप्रज्वलन व महात्मांच्या प्रतिमेचे पुजन करून हार अर्पन उपस्थीत प्रमुख मान्यवर देवीदास पवार ,केंद्र प्रमुख , प्रशांत अकोत सर , डॉ एस चांद चित्रपट दिग्दर्शक, संस्थेचे उपाध्यक्ष विलास हुसे, भाष्कर काळे, सचिव अरुण पोटदुखे , सहसचिव देवानंद कातखेडे, कोषाध्यक्ष बळीराम घाटोळ, संचालक बाबुराव अजगर, संजय काळे, प्रकाश कंडारकर, विजय कातखेडे, डिगांबर काळे, श्री बालाजी इंग्लीश प्रायमरी अॅन्ड सेकंडरी स्कुल वाडेगांवचे मुख्याद्यापक दिपक मसने सर, प्रि- प्रायमरी च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम लोकरस, पत्रकार राजेंद्र पल्हाडे, इत्यादीच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर उपस्थीत सर्व मान्यवरांचे स्वगत करण्यात आले, उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते शाळेतील क्रिडा क्षेत्रात राज्यस्तरावर खेळनाऱ्या व प्रावीण्या प्राप्त विद्यार्थी कु.साक्षी गोपाल सरप, हरी ओम बदरखे, कु दिव्या घाटोळ, कु वैष्णवी घोगरे, ओम काळे, कु. ऐश्वर्या लोखंडे, तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक यांचा ट्रॉपी व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला, तसेच मोहन भातरकर यांचा ही सत्कार करन्यात आला, त्यानंतर गौतम जी बडवे, देवीदास पवार, व शाळेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास वरोकार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,पालक, विद्यार्थी, मोठया संख्येने उपस्थीत होते.प्रस्तावीक साक्षी सरप, व आतुतोष वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुनिल घाटोळ सर, देशमुख मॅडम यांनी केेले, आभार मुख्याद्यापक दिपक मसने सर यांनी केले .