तेल्हारा (विकास दामोदर )- भारत वर्षातील स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या आद्य शिक्षिका माँ सावित्रीबाई फुले यांची जयंती पंचायत समिती तेल्हारा येथील गट विकास अधिकारी यांच्या दालनात मोठ्या उत्सहात बी.डी.ओ.चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षेत साजरी करण्यात आली.
सदर जयंती दिनी माँ सावित्रीच्या कार्यावर, त्यागावर प्रकाश टाकण्यात आला यामध्ये स्वयं सहाय्यता बचत गटाचे तायवाडे साहेब, महात्मा गांधी रॊजगार हमी योजनेचे कार्यक्रम अधिकारी संदीप झाडोकार साहेब, आवक जावक चे ताकोते साहेब, एस.पि.तोरखडे साहेब यांची समयोचित भाषणे झालीत सावित्रीबाई फुले यांच्यामुळे समाजाचा एक अविभाज्य भाग असलेला स्त्री वर्ग आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून दिसून येते ज्या स्त्री वर्गाला जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली जायची ती आज सन्मानाचं जिणं जगतेय ते केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच पुण्याईमुळे आज स्त्री सक्षम झाली त्यात केवळ आणि केवळ सावित्रीबाई फ़ुलेंचेच योगदान आहे असे संदीप झाडोकार तथा एस.पि.तोरखडे साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अध्यक्षीय भाषणात बी.डी.ओ.साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले ज्यां कर्मचाऱ्यांनी स्वयंपूर्तीने या कार्यक्रमासाठी तन -मन -धनानी पुढाकार घेतला ज्यामध्ये श्री.आकोते साहेब, कडू, भोजने, अनिल सरप, गाडगे साहेब, राजेश बाभुळकर साहेब, राजेश मोहोड साहेब, तायवाडे साहेब, शाह साहेब यांची उपस्थिती होती.
शेवटी देवानंद वानखडे यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.