वाडेगांव (डॉ शेख चांद)- शिक्षणअधिकारी प्राथमीक वैशाली ठग, अकोला, गट शिक्षणअधिकारी गौतम जी बडवे यांच्या आदेशाने, केंद्र प्रमुख देवीदास पवार, मुख्याद्यापक समाधान सोर, शाळा व्यवस्था पण समीती अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष तथा चित्रपट दिग्दर्शक डॉ शेख चांद, ज्ञानेश्वर पुंडकर सर, अनिल धोत्रे, गजानन लांबटोंगळे यांच्पा उपस्थीत कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात करण्यात आले त्या नंतर वाडेगांव जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेत स्टॉप कॅन्सर मिशन मल्टीपर्पज संस्था नागपूर मार्फत कॅन्सर रोगा बद्दल मार्गदर्शन व उपाययोजना कशी करावी या बद्दल कु. रुणाली भांगे यांनी सविस्तर माहीती उपस्थीत सर्व शिक्षकांना दिली.
या वेळी अटल बिहारी वाजपायी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा वाडेगांव, श्री जागेश्वर विद्यालय , गुलाम नबी ऊर्दू शाळा, नाना साहेब चिंचोलकर विद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद ऊर्दु शाळा सोफी चौक, जिल्हा परिषद मराठी शाळा इंदीरा नगर, जिल्हा परिषद ऊर्दु शाळा इंदीरा नगर वाडेगांव, जिल्हा परिषद मराठी शाळा तामशी, काशीराम पाटील विद्यालय तामशी, जिल्हा परिषद मराठी शाळा चिंचोली गणू, राजीव गांधी विद्यालय चिंचोली गणू, जिल्हा परिषद मराठी शाळा पिंपळगांव, जिल्हा परिषद मराठी शाळा तांदळी, जिल्हा परिषद मराठी शाळा धाडी बल्हाडी, इत्यादी वाडेगांव केंद्रातील शाळेचे मुख्याद्यापक, शिक्षक, शिक्षीका उपस्थीत होते. तसेच अटल बिहारी वाजपायी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा वाडेगाव येथील सर्व शिक्षक, शिक्षीका, कर्मचारी उपस्थीत होते.