पातूर(सुनील गाडगे)- युवक हा देशाचा पाया आहे आणि आई-वडिलांच्या स्वप्न पूर्ती चा आधार आहे त्यामुळे युवक-युवती विद्यार्थ्यांनी जीवनात नकारात्मक विचार न करता ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे विचार पातूर येथील प्रसिद्ध पत्रकार तथा साहित्यिक देवानंद गहिले यांनी व्यक्त केले.
18 डिसेंबर रोजी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळेच्या वतीने पातूर तालुक्यातील ग्राम चिंचखेड येथे शिक्षण संचालक अमरावती विभाग अमरावती अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना+2स्तर विशेष शिबिर सत्र 2019-20 वर्ष दुसरे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये प्रमुख वक्ते म्हणून “युवकांचा विकास”या विषयावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गहिले बोलत होते.
श्री .गहिले यांनी तब्बल अर्धातास विद्यार्थ्यांना हसत-खेळत कविता गायन करून व्यसनमुक्ती चा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल चव्हाण, तर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा.भास्कर काळे ,प्रमुख पाहुणे तथा वक्ते पत्रकार देवानंद गहिले, पत्रकार अविनाश पोहरे,कार्यक्रम अधिकारी हर्षल ढोंणे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी माधुरी ढोणे, डॉ.राज बोरकर, पोलीस पाटील बळीराम लोखंडे,आदींची मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा.भास्कर काळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध नियोजन सांगितले आणि सेवा योजना कार्याची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
तर डॉ.शांतीलाल चव्हाण यांनी विद्यार्थी यांनी निरोगी शरीर करिता जीवनात सकस आहार कोणता आणि कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले
आणि मादक पदार्थ सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्था वर परिणाम होतो त्यामुळे विचार शक्तीचा ऱ्हास होतो म्हणून युवकांनी व्यसन मुक्त राहावे असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद उगले यांनी तर आभार प्रदर्शन कु.साक्षी पजई यांनी केले. कार्यक्रमाला सनी बगगण,देवेंद्र हिवराळे सह विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते