अकोट प्रतिनिधी(देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील मुडगांव येथील वसुधाताई देशमुख तंत्र निकेतन विघालयात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत भाग्योदय आरोग्य व बहुउद्देशिय शिक्षण संस्था अकोला तसेच लिंक वर्कर स्किम अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य ठाकुर सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लिंक वर्कर स्किम चे जिल्हा साधन अधिकारी सुरजसिंह जाधव हे लाभले होते.यावेळी एच टु व्ही व एड्स आजाराची लक्षणे, कारणे व आजारा बाबत समाजात असणारे गैरसमज इ विषयावर मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांन मध्ये जन जागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भटकर सर यांनी तर संचालन व आभार लिंक वर्कर मिलिंद सरकटे यांनी केले तर हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी महाल्ले सर, फुंडकर सर,सह विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.