मुंबई- शिवसेनेचे पदाधिकारी शेखर जाधव यांच्यावर विक्रोळी येथे आज पहाटे अज्ञात गुंडाकडून गोळ्या घातल्या यात शेखर जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विक्रोळी येथे आज पहाटे अज्ञात दुचाकीवरून आले असता त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी जाधव यांच्यावर गोळीबार केला यात जाधव जखमी झाले. विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील साई मंदिराजवळ सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडल्याचे एका पोलिस अधिकार्यांनी सांगितले. जाधव यांना याच भागातील गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे तर आरोपी गोळ्या घालून पळण्याच्या तयारीत असताना स्थानिकांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हल्ला नेमका कश्यासाठी झाला याचा तपास विक्रोळी पोलीस करीत आहे. काल नागपुरात महापौर संदीप जोशी यांच्यावर हल्ला झाला होता, त्यात जोशी अगदी थोडक्यात बचावले होते.