अकोला – अकोला बार्शीटाकळी रस्त्याची प्रचंड दुरावस्था व अपघाताच्या मालिके विरोधात वंचितच्या वतीने प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास ताला ठोको व रास्ता रोकोचा दिलेल्या अल्टीमेटम मुळे जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग मंडळाने आज रस्ता दुरूस्तीचे काम तातडीने सुरू केले.
बार्शीटाकळी अकोला मार्ग हा अपघात प्रवण मार्ग बनला आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग मंडळ दोन्ही विभागात्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे सातत्याने होणा-या अपघातामुळे अनेकांना जख्मी व्हावे लागले. वाहनांचे नुकसान होत होते. या विरोधात वंचितचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग व राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही विभागाला आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचा अल्टीमेटम कालच दिला होता.
आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास आधी ह्या दोन्ही विभागाला ताला ठोकण्याचा तसेच या मार्गावरील सर्व गावातील नागरिक, वाहने व गुरे ढोरे रस्त्यावर आणुन चक्का जाम आंदोलन छेडण्याचे इशारा दिला होता.
वंचितच्या आंदोलन करण्याच्या पवित्र्यामुळे आज राष्ट्रीय महामार्ग मंडळ जागे होवून रस्ता दुरूस्तीसाठी साहीत्य टाकण्यात आले.ऊद्या पासून कान्हेरी येथून खड्डे बुजविण्यास सुरूवात होणार असून ऊद्या मजूर व रोलर पाठवित असल्याची माहीती कनिष्ठ अभियंता हजारे यांनी दिली आहे.वंचित मुळे हा प्रश्न मार्गी लागत असल्याने गेली वर्षेभरा पासून त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.