तेल्हारा (विशाल नांदोकार)- तेल्हारा येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्रारा संचालीत श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा या शाळेतील माजी विध्याथी प्रथमेश अंबादास तारमेकवार याने आँल इंडिया फेडरेशन आँफ इंडिया या अँथेलँथीक संघटनेच्या वतीने चेन्नई येथे राज्य स्तरीय मैदानी स्पर्धा आयोजित केले होती या स्पर्धेत प्रथमेश याने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे आणि एकाच वेळी तीन सुवर्ण पदक संपादन करून ईतिहास रचला आहे. त्याने 100मीटर, 400मी, 800मी,धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व खेळात तो प्रथम क्रमांक घेणारा या स्पर्धा तील प्रथम खेळाडू ठरलाआहे राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पध्रेत त्याची निवड झाली आहे. प्रथमेश श्री शिवाजी हायस्कूल येथे शिकत असताना राज्य स्तरावर शालेय मैदानी स्पर्धा, गेल रफतार, या सहभागी झाला होता. अखेर त्याने जिद्दीने व चिकाटीने सराव करून राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
राज्य व राष्ट्रीय पातळीवर उंच भरारी घेणारा तालुक्यातील खेळाडू ठरला आहे.
प्रथमेश आपल्या यशाचे श्रेय वडील अंबादास तारमेकवार, आई,सौ अनुराधा तारमेकवार, क़ीडा शिक्षक, शांतीकुमार सावरकर ,नितीन मंगळे,यांना देत आहे.
सर्व स्तरावर
त्याचे अभिनंदन केले आहे.