बाळापुर (प्रतिनिधी)- बाळापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख लोकप्रिय आमदार नितीनजी देशमुख विक्रमी मतदानाने निवडून आल्याबद्दल शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख श्री उमेशआपा भुसारी यांच्या कडून श्री संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज चरनी १११ किलो लाडूचे वाटप करण्यात आले आहे. सर्वप्रथम संत नगरी शेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला शिवसेना अकोला जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाशजी शिरवाडकर साहेब व मा आमदार नितीनबाप्पु देशमुख बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सेवकरामजी ताथोड ह. भ. प. गजानन महाराज पुरी यांनी हारार्पण करून तेथून भजनी दिंड्यासह वाजत गाजत मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले व व कबुल केलेले एकशे अकरा किलो लाडु प्रसादचे वाटप करण्यात आले. तसेच नितीन बाप्पु यांच्या विजयासाठी बाळापूर येथील शिवसैनीक महादेव खारोडे यांच्या कडुन बाळापुर ते संत नगरी शेगांव येथे पाच गुरुवार पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले होते.
उमेश आप्पा भुसारी यांनी आयोजीत केलेला एकशे अकरा किलो लाडुचा महाप्रसाद हजारो भाविकांनी घेतला.तसेच गजानन महाराज मंदिर शेगांव संस्थानच्या वतीने आमदार नितीनबाप्पु देशमुख यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यातआला. यावेळी करणसिंह ठाकुर सुभाष धनोकार सुरेश शेलार शहरप्रमुख आनंद बनचरे संजय शेळके दिलीप ठाकुर यांच्यासह शहरासह, मतदार संघातील व पंचक्रोशीतील समर्थक व चाहते उपस्थित होते.